आजचा सुविचार ३१ मार्च २०१७

कुणी विचारलं, आयुष्यांत काय गेलं आणि काय मिळालं, तर सरळ सांगा की जे गेलं ते कधीच माझं नव्हतं, जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होतं.

निवृत्ती वेतनधारक व विभागीय कार्यवाही

शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्याचेविरुध्द चालू असलेली विभागीय चौकशी संपुष्टात येते काय, सेवानिवृत्तीनंतर विभागीय कार्यवाही चालू करता येते काय व त्याचा निवृत्ती वेतनावर काय परिणाम होतो . यासंदर्भात महाराष्ट्र नागरी सेवा नियमात नेमक्या काय तरतुदी आहेत याबाबतची विचारणा अधिकारी, कर्मचारी विशेषत: सेवानिवृत्त होणा-या किंवा सेवानिवृत्त झालेल्या शासकीय कर्मचा-याकडून वारंवार केली जाते. म्हणून यासंदर्भातील सेवानिय्मात नेमक्या तरतुदी व नेहमी त्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणारा लेख नुकताच यशदातर्फे प्रकाशित केल्या जाणा-या " यशोमंथन " या मासिकात प्रसिध्द करण्यात आला आहे.तो लेख या ब्लॉगवर " महत्वाचे संदर्भ " या शीर्षकाखाली देण्यात आला आहे. संबंधितानी तो जरूर वाचा व जरूर तर तो डाउनलोड करून घ्यावा.

कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळवाद

                                    

" कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळवाद "                                       या महत्वाच्या विषयावरील खाली नमूद केलेले साहित्य "  महत्वाचे संदर्भ" या   शिर्षकाखाली " या  ब्लोगवर उपलब्ध करून देणेत  आले आहे. संबंधिताना ते डाउनलोड करून घेता येईल .


1)THE PROTECTION OF WOMEN AGAINST SEXUAL HARASSMENT
AT WORK PLACE BILL, 2010

n2) FREQUENTLY ASKED QUESTIONS ON SEXUAL HARASSMENT (D.O.P.T.)

n3) SEXUAL HARASSMENT AT WORK , PRACTICAL GUIDe-,BY     Neeta Raymand

 

  IMPORTANT JUDGEMENTS.

n5) SEXUAL HARASSMENT AT WORK PLACE BY Y.M.C.A

n6) SEXUAL HARASSMENT AT WORK PLACE- CODE OF CONDUCT BY N.C.W.

यशदा संस्थेने प्रसिध्द केलेले मराठीतील नवीन पुस्तक " महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९

                                                         
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९(मराठी) हे श्रीधर जोशी, भा.प्र.से.(नि) व माजी उपाध्यक्ष,महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, यांनी संपादित केलेले पुस्तक यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी या राज्याच्या अग्रणी प्रशिक्षण संस्थेने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकात ३१- ०८- २०१२ पर्यंत सुधारित नियम ,महत्वाच्या टीपा,  महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके, चौकशी अधिकारी/सादरकर्ता अधिकारी/ बचाव सहाय्यक/ शिस्तभंगविषयक अधिकारी/ अपीलीय अधिकारी इत्यादींसाठी मार्गदर्शक सूचना,न्यायालयीन निर्णय इत्यादी माहिती दिली आहे. सदर पुस्तक चौकशी अधिकारी, विभागीय अधिकारी व कर्मचारी तसेच वकील वर्गास देखील उपयुक्त आहे.

सदर  पुस्तक यशदा संस्थेत १५०  रुपयांस उपलब्ध आहे.

पुस्तक खरेदीसाठी ०२०-२५६०८२६६ या दूरध्वनीवर श्रीमती मनीषा कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा.

ओक्टोबर 2012 मध्ये निर्गमित केलेले महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके

 ओक्टोबर 2012 मध्ये शासनाने निर्गमित केलेले खालील महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके , " नुकतीच निर्गमित केलेली परिपत्रके व शासन निर्णय" या शिषखालील तक्त्यामध्ये अनुक्रमांक 60 ते 65 वर उपलध आहेत. संबंधितांनी ती जरूर तर ती डाऊनलोड करून घ्यावीत.

1) तुरूंगातील  बंद्याना अभिचन रजा मंजूर करणे बाबत -गॄहविभाग परिपत्रक दि. 8-10-2012

2) नगरपरिषदा अधिनियम 1965-  नगर्विकास विभागअध्यादेश क्र.-10, दि. 8-10-2012

3)  आर्थिक व सांख्यिक सेवा संवर्ग निर्माण करणे, नियोजन विभाग शाऩि. दि. 11-10-2012

4) Establishment of On-line library, G.A.D. Circular no. CSO-2012/50/O-1 dt.11-10-2012

5) म्रुत्यूपूर्व जबानी- विशेष कार्यकारी अधिकारी यांना न बोलावणे बाबत, गॄह विभाग परिपत्रक दि.11-10-2012

6) राज्यात टंचाई परिस्थिती जाहीर करणे, 2012-2013, म.व वन विभाग शा,नि.दि. 25-10-2012

म. ना. से. (शिस्त व अपील) नियम १९७९ (इंग्रजी ) पुस्तकमहाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ हे श्रीधर जोशी यांनी संपादित केलेले पुस्तक यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी या राज्याच्या अग्रणी प्रशिक्षण संस्थेने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकात
३१- ०८- २०१२ पर्यंत सुधारित नियम ,महत्वाच्या टीपा, न्यायालयीन निर्णय इत्यादी माहिती दिली आहे. सदर पुस्तक चौकशी अधिकारी, विभागीय अधिकारी व कर्मचारी तसेच वकील वर्गास देखील उपयुक्त आहे. सादर पुस्तक यशदा संस्थेत १०० रुपयांस उपलब्ध आहे.पुस्तक खरेदीसाठी ०२०-२५६०८२६६ या दूरध्वनीवर श्रीमती मनीषा कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा.