आजचा सुविचार २० फेब्रुवारी २०१६

तारुण्यात अकाली मृत्यू आला तर लोक हळहळतात आणि म्हणतात, अरेरे लवकर गेला त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल होता. दीर्घायुषी झालात तर तेच म्हणतील, अजून किती दिवस सरकारची पेन्शन खाणार कुणास ठाऊक ?

निलंबित कर्मचा-याकडून शासकीय नुकसानीची वसुली

एखाद्या कर्मचा-याकडून पूर्वी  घडलेल्या एखाद्या  शासकीय नुकसानीची वसुली तो निलंबित होण्यापूर्वी पासून वेतनामधून चालू असेल तर अशी रक्कम निर्वाह भत्त्यामधून वसूल करता  येणार नाही, ही यशदा मधील मोफत सल्ला कक्षाची धारणा वित्त विभागाने नुकतीच  पक्की केल्याचे त्यांच्या दि. १० जानेवारी २०१७ च्या पत्राने पक्की केली आहे.

शिस्तभंग विषयक अधिका-यांनी याची नोंद घ्यावी व योग्य त्या प्रकरणात त्याप्रमाणे कार्यवाही करावी.